skip to Main Content

“संगिनी” म्हणजे सोबत चालणारी मैत्रीण. प्रिव्हा संकुला तील आम्ही मैत्रिणी रोज सोसायटीच्या आवारात बसायचो. एक दिवस आमच्या मनात आले की आपण एक ग्रुप करावा. ज्याला एक नाव असेल, स्वतःची एक ओळख असेल, आणि त्यातूनच १ मे २०१९ रोजी आम्ही १८ जणांनी मिळून ‘संगिनी’ ग्रुपची मुहूततमेढ रोवली. इथे कुठल्याही प्रकारची घरातली चर्चा करायची नाही, एकमेकींच्या पाठीमागे कोणीही काही बोलायचे नाही, मुलांबद्दलच्याआनंदाच्या प्रगतीच्या बातम्याइथेजरूर सांगायच्या अशा भक्कम अटींवर संगिनी ग्रुप सुरू झाला. “आनंद देणं अन आनंद घेणं” हे संगिनीचं ब्रीद वाक्य आहे.

हळूहळू संगिनी आकार घेऊ लागलं आणि नवनवीन सभासि संगिनी मध्ये प्रवेश करू लागले. संगिनी मध्ये वयोगट ५० ते ८६ असा आहे, पण सगळ्याच गर्ल्स (मुली) अठरा वर्षांच्या आहेत आणि मग सुरू झाला वाढदिवस, पार्ट्या, पिकनिक, पिकनिक वेगवेगळे ड्रेसेस, नाचगाणं ,कदाचित ज्या गोष्टी आयुष्यात करायच्या राहून गेल्या त्या… आणि त्याचबरोबर एक सामाप्रजक बांधिलकी पण ग्रुपने जपली.रत्नागिरी, सांगली पूरग्रस्तांना मदत, अनाथाश्रमातील तीन मुल आम्ही दत्तक घेणे, सोसायटीचा गणपती उत्सव, होळी, माता की चौकी, १५ ऑगस्ट, २६ जानेवारी, छत्रपती प्रशवाजी महाराज जयंती, डॉक्टर बाबासाहेब आंबेड्कर जयंती, मराठी राजभाषा दिन या आणि अशा सोसायटीच्या अनेक कायतक्रमात संगिनी समूह सहभागी होऊ लागला.

आमची संगिनीची वेळ संध्याकाळी साडे सात ते साडे आठ अशी आहे. आमच्याकडे शाळेप्रमाणे टाईम टेबल आहे. सोमवार ते शनिवार संगिनी असतं, रविवारी सुट्टी. आम्ही रोज नियमित गायत्रीमंत्र म्हणतो, श्री राम जय राम जप करतो, त्यानंतर रोज वेगवेगळे खेळ, कधी एखाद्या अक्षरावरून शब्दसांगणे, म्हणी, समानाथी शब्द, बेरीज वजाबाकी, इंग्लिश मधील संप्रक्षप्त शब्दांचे पूर्ण रूप (जसे ICU,CID वगैरे), शब्दांची अंताक्षरी असेअनेक खेळ खेळतो.दर बुधवारी करमणूक म्हणून Housie खेळतो.गुरुवारी भजन असतं. दर शुक्रवारी वैयक्ति गुणदर्शन दिवस असतो. प्रत्येक संगिनीला त्यात सहभाग घ्यायचाअसतो. महाभारत वाचन, राम नाम वहीत लिहिण्याचा पण उपक्रम आहे.

प्रत्येक महिन्यात ज्या संगिनींचे वाढप्रिवस असतात, त्यांना आम्ही ओवाळतो, त्यांच्यावर आमच्या दिपाली डोंगरकर ह्या एक संगिनी छान कविता लिहीतात, प्रिव्हा कॅफे मध्ये पार्टी असते, छान सांस्कृतिक कार्यक्रम आम्ही साजरे करतो. त्यानंतर धम्माल डान्स असतो. ८६ वर्षांच्या सावंत काकूपण काठी हातात घेऊन धमाल नाचतात आणि मग मस्त जेवण..

संगिनीचा व्हाट्सअप ग्रुप आहे. संगिनी नावाचं लावलेलं छोटसं रोपट वाढूलागलंय. आता ४५ सभासद आहेत. मी माझ्या संगिनीना नेहमीच सांगते आपण सर्व कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाड्ल्या आहेत, अजूनही पार पाड्तोच आहोत. पण आपलं वय असं आहे की २४ तासातला एक तास तरी सर्वांनी फक्त स्वतः साठी जगलं पाहिजे. माझ्या ज्या ज्येष्ठ भगिनी आहेत त्यांचा “संध्याकाळी घरी काय करावं” हा प्रश्न संगिनीनेसोड्वला आहे. सुदैवाने आपल्या सोसायटीत बसण्याची खूप छान सोय आहे. आपले सोसायटीचे अध्यक्ष श्री मनोज वैद्य यांचं सहकार्य नेहमीच संगिनी ग्रुपला असतं.

संगिनी ग्रुपचा इन्स्टा अकाउंट पण ओपन केलं आहे. संगिनी ग्रुपने पाचव्या वर्षात पदार्पण केलं आहे. १ मेला आम्ही वर्धापन दिन साजरा करतो १ मे २०२४ ला संगिनी ग्रुपला पाच वर्ष पूर्ण होत आहे. आम्ही सगळ्या संगिनी बहुभाषिक असून,आमच्या सिळ्यांचं आता एक कुटुंब बनलं आहे.

Back To Top